स्टेप क्रं. १:- स्वत: साठी तुमचा स्वत:चाच 10 मिनिटे वेळ आरक्षीत करून घ्या.
स्टेप क्रं. २ :- घरातील / परिसरातील एक शांत आणि एकांत असलेली जागा निवडा
स्टेप क्रं. ३ :- शांत स्थितीत डोळे बंद करून स्वस्थ बसा.
स्टेप क्रं. ४ :- आता, आपल्यावर अवलंबून असलेल्या आपल्या कुटुंबाचे चित्र डोळयासमोर उभे करा.
स्टेप क्रं. ५ :- आपले स्वत: चे वय, आपल्या वरिल जाबाबदारी यांचे थोडे स्मरण करा
स्टेप क्रं. ६ :- शांत चित्ताने स्वत: चे अंर्तमनाला पुढील प्रश्न विचारा
१) मी आत्ता पर्यंत किती कंत्राटी नोक-या बदलल्या? त्यात किती त्रास झाला?
२) कंत्राटी कर्मचारी म्हणून मला कांही आत्मसन्मान आहे का?
३) आजची माझी कंत्राटी नोकरी किती काळासाठी संरक्षित आहे?
४) उदया ही नोकरी नसताना निर्माण होणा-या अडचणीत कोण मदतीला येईल?
५) माझ्या अडचणीचे निराकरण करण्यासाठी माझ्याकडे हक्काचे व्यवसापीठ आहे का?
६) आजचे माझे कंत्राटी नोकरीत मला सुख, शांती आणि समाधान आहे काय?
७) माझे कंत्राटी नोकरीच्या भरवश्यावर मी माझे कुटुंब संरक्षित ठेऊ शकतो का?
८) उदया कांही कारणाने माझी नोकरी नसेल तर?
९) र्दुदैवाने मी जगात नसेल तर माझे कुटुंबाचे काय होईल?
१०) ही परस्थिती बदलण्यासाठी मी स्वत: कांही प्रयत्न करू शकतो का?
स्टेप क्रं. ७ :- वरिल ७ प्रश्नांचे उत्तराने तुमचे स्वत: चे मन समाधानी आणि शांत, तृप्त झाले असेल व आहे त्या परिस्थीतीत तुम्ही तुमच्या कुटुंबाच समाधान मानत असाल तर, पुढील संदेश वाचण्याची तुम्हाला गरज नाही. परंतू वरिल ७ प्रश्नांची उत्तरे असमाधानी आणि तुमचे मन विचलीत करणारी असतील तर निश्चीतच तुम्हाला पुढील संदेश वाचण्याची नितांत गरज आहे.
तर स्टेप क्रं. 7 नंतर ज्यांचे आंर्तमन असमाधानी आणि विचलीत झाले आहे, त्यांनी खालील महत्वपूर्ण संदेश वाचावा . . . . .
सर्वांनी एकत्र येण्याची गरज का आहे?
राज्य शासना महाराष्ट्रात जवळपास १८० शासकीय विभागा / प्रकल्प राबविले जात आहेत, त्यामध्ये विविध योजनांचा अंतर्भाव आहे. या सर्व योजना / उपक्रम / प्रकल्पांचे राज्यात प्रभावी अंमबलजावणीसाठी जवळपास २० ते ३० लाख कंत्राटी कर्मचारी योगदान देत आहेत आणि आज त्यांचे योगदानाच्या जोरावर अनेक योजना / उपक्रम / प्रकल्प राज्यत यशस्वीरित्या राबविले गेले आणि समाधानकारक लक्षांक साध्य पूर्ण करून बंद सुध्दा झाले. परंतू या सर्वांमध्ये आपल्या कंत्राटी कर्मचारी यांनी जे योगदान दिले, त्या मोबदल्यात शासनाने आपल्या कंत्राटी कर्मचारी यांचेसाठी काय केले?
त्यामुळे आपण शासनास दिलेल्या आपल्या योगदानाच्या मोबदल्यात आपल्याला अनज्ञेय ठरणा-या लाभांची व सुविधांचा हक्क मिळविण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.
संघटनेची गरज का आहे?
आज बहुतांश विभागात कांही स्वतंत्र संघटना कार्यरत आहेत, त्यामाध्यमातून त्यांचा लढा सुरू आहे, कांहीचे प्रकारणे न्यायप्रविष्ठ आहेत तर कांहीना मा. न्यायालयाने सकारात्मक दिलासा दिलेला आहे. परंतू हे सर्व कांही ज्या त्या विभागा पूरते मर्यादीत आहे. जो पर्यंत करारसेवेतील कर्मचारी यांचेसाठी संपूर्ण राज्यासाठी एक आदर्श आणि सर्वसमावेश असी नियमावली निर्धारित होणार नाही, तो पर्यंत आपले प्रश्न संपनार नाहीत.
आज आपली संघटना ना कोणत्या एका विभाग किंवा योजना पूरती मर्यादीत नाही, आपले संघटनेच्या माध्यमातून जनहित याचिकेच्या माध्यमातून मिळणारा न्याय हा राज्यातील प्रत्येक विभागातील करारसेवेती कर्मचारी यांना मिळाला पाहीजे हे आपले प्रमुख उदिष्ठ आहे.
करारसेवा कर्मचारी कल्याणकारी संघ ही संघटना राज्यातील प्रत्येक कंत्राटी कर्मचारी यांचे अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीचे एक हक्काचे व्यासपिठ आहे. प्रत्येक कंत्राटी कर्मचारी यांचा आधार आहे. अन्यायग्रस्थ कंत्राटी कर्मचारी यांना त्यांचा हक्क व न्याय मिळवून देण्यासाठी उभारण्यात आलेले एक कटीबध्द संघटन आहे.
आज प्रत्येक कंत्राटी कर्मचारी यांचे आंर्तमन इतके मृत आणि झाले आहे की, कांहीनी आपला आत्मसन्मान सोडून दिला आहे. शासकीय अधिकारी यांचे हाताखालची बाहुली बनले आहेत, केवळ “हो सर” इतकच काम आहे कंत्राटी कर्मचारी यांचे, आपल्या स्वत: न्याय हक्काची जाणीव सुध्दा कोणाला राहील नाही, जवळपास बरेच कंत्राटी कर्मचारी विचार करतात की,
१) आपल्याला काय करायचय,
२) त्यांच ते बघतील
३) आपली नोकरी तर आहे ना
४) आपल्याला काय गरज आहे
५) कशाला संघटनेत जायचे
६) अधिका-यांना कळाले तर ते त्रास देतील
७) अधिकारी आपल्या ओळखीचे आहेत, ते आपल्याला मदत करतील
परंतू, आपण स्वत: आपल्यासाठी लढणार नाही, तो पर्यंत आपल्याला आपले हक्क आणि आत्मसन्मान मिळणार नाही. अडचणीच्या काळात कोणी मदतीला येणार येणार नाही. यामुळे सर्वांनी या मानसिकतेतून बाहेर पडण्याची गरज आहे. त्याशिवाय कांही होणार नाही. नाहितर आहे ही परस्थिती कायम राहील आणि आपण आपल्या हक्कांपासून असेच वंचित राहू, यासाठी स्वत: चे आंर्तमन जागृत करा. . . आत्मसन्मान जागृत करा. . .
संघटनेच्या वतीने माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की, प्रत्येकाने या चळवळीत आपला खारिचा वाटा उचलावा, यासाठी सर्वांनी दिवसभरातील कांही वेळ संघटनेच्या कामासाठी दयायची आहेत, यामध्ये प्रामुख्याने पुढील प्रमाणे कार्य करायचे आहे,
१) आपण कार्यरत असलेल्या कार्यालयातील आपल्या सारखेच इतर करारसेवेतील (कंत्राटी) कर्मचारी यांना संघटने विषयी, संघटनेचे ध्येय धोरणा विषयी माहिती देऊन त्यांना या प्रवाहत सहभागी करून घेणे.
२) आपण ज्या गांवात / तालुका / जिल्हा / विभाग स्तरावरील कार्यालयात कार्यरत असाल, त्या ठिकाणी इतर विभागाचे कार्यालयातील करारसेवेतील (कंत्राटी) कर्मचारी यांचेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करावा. त्यांना संघटने विषयी, आपले ध्येय धोरणा विषयी माहिती देऊन त्यांना या प्रवाहत सहभागी करून घेणे.
३) तसेच, संघटनेच्या वतीने प्रत्येक रविवारी, आढावा बैठकीचे आयोजन करण्यांत येते. सदर बैठकीस न चुकता उपस्थित रहावे. सदरची बैठक ही आपल्या साप्ताहीक दिनचर्येचा एक भाग असली पाहिजे. कोणतेही काम असो, शक्यतो बैठकीस उपस्थित राहण्याचा प्रमाणिक प्रयत्न सर्वांनी केला पाहिजे.
आपले आणि आपले कुटुंबाचे भविष्य उज्वल व संरक्षित करण्यासाठी दुसर कोणी येणार नाही किंवा ज्या विभग / प्रकल्पात काम करता तिथला कोणताही अधिकारी येणार नाही. ज्याला-त्याला, ज्याचे-त्याचे पडले आहे, कोणी कोणासाठी मोकळा नाही, योजना / प्रकल्प संपला की सगळे आपल्या मार्गी निघून जातील, परंतू,
!! आपली संघटना कायम आपल्या कंत्राटी कर्मचारी यांच्या हितासाठी त्यांचे सोबत असेल !!
हिच ती वेळ आणि हाच तो क्षण आहे. .. ज्याव्दारे आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी एकत्र योऊन लढा देण्याची गरज आहे. इति अंती “ ज्यांचे अंर्तमन जागृत झाले असेल त्यांनी . . . . .”
** तात्काळ आपली नोंदणीची प्रक्रिया पूर्ण या चळवळीत आपला खारिचा वाटा उचला आणि हा लढा लढण्यासाठी संघटनेचे हात बळकट करा ! **
सदस्य नोंदणीची लिंक :- https://bit.ly/CEWA-Registration
------------------------****************************------------------------
अधिक माहितीसाठी www.cewa-mh.in संकेतस्थळास भेट दया
------------------------****************************------------------------